1. Hindi
2. Urdu
3. Bangali
4. Gujarathi
5. Marathi
6. Aasami
7. Kannad
8. Tamil
9. Telagu
10. Oriya
11. English
|
|
...आणि मुले जेवायला लागली
फार वर्षांपूर्वी भारतात एक गुणी राजा राज्य करायचा. त्याला एक मुलगा व एक मुलगी होती. त्यांचे नाव बंटी व बबली होते. सर्व सुखी होते. दुःख फक्त एकच होते. बंटी व बबली जेवायचे नाहीत. ते दोघेही सुकत चालले होते. वैद्यांनी सर्व काढे त्यांना दिले. डॉक्टरांनी टॉनिक दिले, दूध प्यायला लावले. पण बंटी व बबली काही पोटभर जेवेनात, अंगात काही भरेना वा नीट झोपेना. त्यांना सू खूप व्हायची पण संडासला खडा व्हायचा. संडास व्हायचीच नाही.(अगदी आपल्या मुलीसारखं !)
दररोज औषधे, दूध पिण्याचा खूप त्रास बंटी व बबलीला झाला. एकेदिवशी बंटी व बबली घरातून पळून राजधानी बाहेरच्या जंगलात गेले. धावून धावून थकून ते एका झाडाखाली बेशुद्ध झाले. जंगलातील एका निपुत्रिक आदिवासी जोडप्याला ते सापडले. त्यांनी बंटी व बबलीला घरी नेले. त्यांना जेवण दिले. पण ती दोघेही काही जेवेना. सारखी बसून राहायचे. आजूबाजूची मुले त्यांना म्हणाली ""अरे, बसेल त्याला भूक कशी लागेल ? खेळा, कामे करा, बघ भूक लागते की नाही ते.'' बंटी व बबलीने त्यांचे म्हणणे ऐकले. ती दोघे जंगल बघायला बाहेर पडले. त्यांने पाहिले की सगळे काम करीत होते. मधमाशा मध गोळा करीत होत्या, मुंग्या साखर नेत होत्या, आदिवासी फळे, लाकूडफाटे गोळा करीत होते, शिकार करीत होते. बंटी व बबली दोघे त्यांना मदत करू लागले. त्यांना छान वाटले व कडकडून भूक लागली. मग त्या दिवसापासून ते रोज मस्त खेळले, धावले, रोज त्यांनी अंगमेहनतीची खूप कामे केली, मस्त जेवले, मस्त झोपले. दिवसभर फळे खाऊनही त्यांना मस्त जेवण जाऊ लागले. 100 दिवसांत बंटी व बबली अंगाने भरली. काही दिवसांनी गावची जत्रा होती. बंटी व बबली सर्वांसह जत्रेला गेले. तेथे स्पर्धेत भाग घेऊन पहिले आले. बक्षीस द्यायला राजा-राणी आले. बंटी व बबली इतके अंगाने भरले होते की राजा-राणीने त्यांना ओळखलेच नाही. ते पाया पडत राजा-राणीला म्हणाले,""आम्ही तुमचे बंटी बबली.''
राजाने बंटी बबलीला घरी नेले. त्यांनी सर्वांना सांगितले की आम्हांला तुम्ही सारखे दूध, चहा, पातळ अन्न द्यायचे. त्याने भूक मरायची. त्यात पाणीच जास्त, त्याने उपासमार व्हायची. आम्ही बारीक झालो. त्यामुळे झोप पण नीट यायची नाही. असे जंगलात नव्हते. आम्ही भरपूर फळे, रानमेवा खायचो, खूप धावायचो, खूप खेळायचो, कामही करायचो. त्यामुळे आम्हांला भूकही भरपूर लागायची. छान जेवणामुळे आमची वाढ झाली.
लोकहो, मुलांना दूध, चहा, पेज, फळांचा रस, पातळ वरण, आमटी देऊ नका. जमिनीवर फळांचे तुकडे, खाऊ ठेवा. त्यांचे खिसे नेहमी खाऊने भरून ठेवा. सर्वोत्तम दान मैदान, प्रत्येक गावात वॉर्डमध्ये मुलांसाठी मैदान करा. रोज त्यांना एक तास तरी खूप घाम येईल असे मैदानी खेळ खेळू द्या. बघा सर्व मुले मस्त वाढतील. भारत भाग्यविधाते होतील. सर्व मुला-मुलींना करदोडा बांधा. ना ढिला, ना घट्ट, मुले बारीक झाली तर तो ढिला व वाढली की तो घट्ट होईल. मोठेपणी लठ्ठपणा टाळायला मदत करेल. लोकांनी ते ऐकले. त्यांची मुले छान झाली.
आपण ही बंटी बबलीची गोष्ट मैत्रिणींना सांगा. झोपतेवेळी भावंडांना सांगा. भावंडांना गप्पात मित्र व 15 भाषात 112 कोटी भारतीयांना टी.व्ही., रेडिओ, वृत्तपत्रे, भाषणे, एस.एम.एस. इ मेलने सांगू या.
(प्रेरणा ः दुर्गा झाली गौरी नाटक. प्रत्येकाने जरूर पाहावे.)
|
|
|
|